महिलांसाठी आधार देणारी एलआयसीची आधारशिला पॉलिसी

एलआयसीची आधारशिला पॉलिसी

आजच्या धकाधकीच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या आपले भविष्य आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे फार गरजेचे आहे. एलआयसीच्या वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांद्वारे हे शक्य होऊ शकते. तसेच महिलांसाठीखास करून विशेष गुंतवणूक योजना एलआयसीने आणल्याने महिलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकते.

या लेखामध्ये खास महिलांसाठी एलआयसी आणलेल्या आधारशिला पोलिसी योजनेची माहिती घेणार आहोत.यामध्ये महिला दररोज 29 रुपये जमा करून लाखो रुपयांचा फायदा घेऊ शकता. आधारशिला पॉलिसीमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगल्या लाईफ कव्हरेजसह चांगली बचत करता येऊ शकते. या पॉलिसीमध्ये आठ ते 55 वर्ष वयोगटातील महिला लाभ घेऊ शकता. ही पॉलिसी घेतल्यानंतर तिचा प्रीमियम हा महिलेचे वय आणि पॉलिसीचा कालावधी यावर अवलंबून असतो.

उदाहरणार्थ वयाच्या तिसाव्या वर्षी वीस वर्षासाठी गुंतवणूक केली तर साडेचार टक्के करा सह पहिल्या वर्षीचा प्रीमियम दहा हजार 959 रुपये एवढा येतो. पहिल्या वर्षीच्या हप्त्या नंतर ही रक्कम दहा हजार 723 एवढी होती. त्यामुळे दररोज किमान 29 रुपयांची बचत करावी लागेल. अशी एकूण दोन लाख 14 हजार 696 रुपये जमा होतात. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला तीन लाख 97 हजार रुपये परत मिळतात.

तसंच या पॉलिसीमध्ये तुम्हाला डेथ बेनिफिट मिळतो. तसेच ही पॉलिसी काही कारणाने जर रद्द करायचे असेल तर प्लान घेतल्यानंतर पंधरा दिवसात ती रद्द करता येते.

Source : Krishijagran